वर्धा :-मित्राच्या वाढदिवसाची पार्टी बेतली जीववार, तीन मृत, एक गंभीर
वर्धा :-सेलू, वर्धा नागपूर महामार्गवरील सेलू बायपासवार हॉटेल कोहिनुर जवळ 14 फेब्रुवारी रात्री 1वाजता मित्राचा वाढदिवस साजरा करून गावाकडे परत येतांना M H14-9215 या क्रमांकचे चारचाकी वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला, जखमीला उपचारर्थ नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिघा मृतावर आत्यासंस्कार करण्यात आले. मृतकमद्धे वर्धा नजीकच्या सिंदी (मेघे )भागातील रहिवासी आहे. मृत्यू झालेल्या युवकांमद्धे समीर सुटे (27),शुभम मेश्राम (28),व सुशील मस्के (29),यांचा समावेश आहे. तर कार चालक धनराज धाबर्डे (39),गंभीर जखमी असून त्याच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.यातील मृतक सुशील मस्के व जखमी धनराज धाबर्डे हे स्वप्न नागरी परिसरातील राहिवासी असून, इतर दोघे सिंदी (मेघे )भागातील राहिवासी आहे. या सर्व घटनेचा सेलू पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सेलू पोलीस करत आहे.