मांडवी बस्थानक येथे संत सेवालाल महाराजांची
286 वी जयंती साजरी.
किनवट - मांडवी येथे आज रोजी बंजारा समाजाचे आद्य दैवत, महान संत, क्रांतिवीर संत सेवालाल महाराज यांची मांडवी बस्थानक येथे 286 वी जयंती साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेच पुजन कार्तिक चव्हाण, सरपंच प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले,प्रविण श्रीमनवार ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते नारळ फोडून पूजा करून अभिवादन केले या वेळी एकमतचे पत्रकार दिलीप भाऊ राठोड, वतारे साहेब, नवीन दिसलवार, दिनेश लेनगुरे, कलाम शेख,अनेक महिला, पुरुष प्रवाशी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन मनोज पुसनाके यांनी केले.