
21 वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत नांदेडचे दोन नाटके होणार सादर.
टायनी एंजल्स स्कूल चे नाटक संभाजीनगर, बीड आणि नांदेड केंद्रातून प्रथम.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २१ व्या बालनाट्य स्पर्धेत, संभाजीनगर, बीड आणि नांदेड केंद्रातून टायनी येंजल स्कूल ने प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
धनंजय सरदेशपांडे लिखित, दिनेश कवडे दिग्दर्शित प्लॉट नंबर शून्य या बालनाट्याचे दिनांक २७ जानेवारी रोजी नांदेड केंद्रावर सादरीकरण झाले. या नाटकाने व्यक्तिगत तीन पारितोषिक पटकावत सांघिक प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. यात दिनेश कवडे यांना दिग्दर्शनाचे प्रथम, गौतम गायकवाड यांना नेपथ्याचे प्रथम आणि साई पतंगे या बाल कलावंतास अभिनयाचे रोप्य पदक मिळाले आहे. तर शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स या संस्थेच्या आभाळ या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. या नाटकास महेश घुंगरे यांना दिग्दर्शनाचे द्वितीय, माणिक थोरात याना प्रकाशयोजनेचे द्वितीय, सम्राट डोइबळे यास नेपथ्याचे द्वितीय आणि स्वराज कराळे या बाल कलावंतास अभिनयाचे गुणवत्ता प्रमाण पत्र मिळाले आहे.
या दोन्ही बालनाट्याचे अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. यावर्षी बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरी येथे संपन्न होत असून १७ फेब्रुवारी रोजी या दोन्ही बालनाट्याचे सादरीकरण होणार आहे. त्याकरिता टायनी यंजल्स स्कूलची टीम १६ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीच्या दिशेने रवाना होणार आहे. यात प्रेरणा चिंतेवाड, साई पतंगे, श्रद्धा मुंडे, अवणी तोंडे, आदित्य शिरसीकर, सिद्धेश राउत, साक्षांक हाजगुडे, नमन जादोन, वरदायिनी लिंबूरकर, सिद्धी चव्हाण, वरद क्षीरसागर, विश्वजित पाठक यांच्या भूमिका असून, नेपथ्य- गौतम गायकवाड, प्रकाश योजना- किरण टाकळे, रंगभूषा, वेशभूषा- सुधांशू सामलेटी, संगीत संयोजन- संदेश महाबळे, रंगमंच सहाय्य- सुजाता टेळकिकर यांची असणार आहे. गिरीष ढाफने यांनी सर्व कलावंतांचे अभिनंदन केले असून पुढील प्रयोगास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.