
विश्वकर्मा प्रगटदिन उत्सवात महाप्रसाद वितरण
स्थानिक लोखंडी पायऱ्या परिसरातील विश्वकर्मा मंदिर येथे आज विश्वकर्मा प्रगटदिन महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शारंगधर पतसंस्थेचे कार्यकारी संचालक तथा युवासेनेचे नेते नीरज रायमुलकर यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले
विश्वकर्मा प्रगट दिन महोत्सव समितीच्या वतीने काल व आज विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी रवींद्र राऊत, विजय राऊत यांनी सपत्नीक स्वामी विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला महाअभिषेक केला. त्यानंतर तालुक्यातून आलेल्या सुतार समाज बांधवांनी महाआरती केली. माऊली भजनी मंडळाच्या वतीने भजन संध्या कार्यक्रमात कलावंतांनी भजने सादर करून भाविकांची मने जिंकली. महोत्सवात आदिनाथ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वकर्मा योजना नोंदणी शिबिर घेण्यात आले, त्यात युवकांनी मोठा सहभाग नोंदवला. नीरज रायमुलकर यांनी स्वामी विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती केली. महोत्सव समितीच्या वतीने आयोजित महाप्रसाद वितरण कार्यक्रमात
नीरज संजय रायमुलकर यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी भाविकांचे मोठी उपस्थिती होती. प्रगट दिन महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समिती चे पदाधिकारी आणि सुतार समाज बांधवांनी परिश्रम घेतले.