
नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले...!
नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले...!
----------------------------------------------
प्रतिनिधी
उदेसिंग पाडवी
Social Media Activist
(MH) नंदुरबार
----------------------------------------------
नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैर कारभार उघड झाला आहे.
पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी तब्बल दीड हजाराहून अधिक आधार कार्ड उघड्यावर फेकले आहेत. तसेच पोस्टात आलेल्या महत्त्वाचे कागदपत्रांचे वाटप न करता ते देखील फेकून दिले आहेत.
कागदपत्रे वाटप केल्याचे भासवत नागरिकांच्या नकली सह्या कर्मचाऱ्यांनी केल्याचे उघड झाले आहेत. आधार कार्ड, कोर्टाच्या नोटिसा, बँक चेक यासह इतर महत्त्वाचे कागदपत्रे उघड्यावर फेकल्याचे पाहायला मिळत आहे.
यामुळे पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा समोर आला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून पोस्ट ऑफिसमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
एकीकडे आदिवासी बांधवांना एक आधार कार्ड काढण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करत तालुका स्तरावर यावं लागतं, मात्र पोस्टामार्फत आलेले आधार कार्ड आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र वाटप न करता उघड्यावर फेकल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेनंतर पोस्टाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या विषयावर कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.