धाराशिव मध्ये सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी कडून संस्थेच्या नावाने खंडणी वसुली.
प्रतिनिधी धाराशिव - सामाजिक संस्थेचे पदाधिकारी असा बनाव करून संस्थेच्या नावाने प्रोजेक्ट करायला लाऊन पैसे देतो असे आमिष दाखवून काम करून सुद्धा खंडणी आणि धमकी देण्याचा प्रकार धाराशिव येथे घडत आहेत.
धाराशिव येथील जनजागृती कार्यक्रम करा तुम्हाला पैसे मिळतील असे सांगून प्रोजेक्ट करायला लावला व तो ही कोणत्याही कायदेशीर पत्र किंवा संमती शिवाय व काम केल्यावर संस्थेच्या पदाधिकारी कडून काम केले नाही व दिलेले पैसे वापस दे म्हणून दबाव टाकून खंडणी वसुली चा प्रकार धाराशिव येथे घडत आहे.
संस्था कोणतीही योजना किंवा प्रोजेक्ट राबवत असताना त्याबाबत पत्र किंवा तत्सम कार्यक्रमाचे प्रास्ताविक असे काढत असते पण तसे न करता आमिष दाखवून काम करून घेऊन पुन्हा खंडणी मागणे हे प्रकार संस्थेचे पदाधिकारी यांच्याकडून घडला आहे.