logo

माता रमाई यांची 127 वी जयंती नवबौद्ध युवक संघटना तक्रारवाडी यांच्या वतीने साजरी

भिगवन प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात प्रत्येक पायरीवर संघर्ष होता. खुद्द बाबासाहेबांच्याच शब्दात सांगायचे तर त्यांच्यासोबत दुःख सहन करायला कोणी तयार असेल तर त्या रमाबाई आंबेडकर होत्या. ७ फेब्रुवारी हा रमाबाई आंबेडकर यांचा जन्मदिवस होय. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई होत्या.
नव बौद्ध युवक संघटना तक्रारवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीआंबेडकर नगर तक्रारवाडी येथे साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. सर्व उपस्थित मान्यवरांनी माता रमाईच्या जीवन व कार्य सांगितले.
यावेळी कार्यक्रमासाठी तक्रारवाडी गावच्या सरपंच सौ मनीषा ताई वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ राणीताई आढाव, सौ सीमाताई काळंगे, सौ संगीता ताई आढाव, माजी सरपंच सतीश वाघ, आण्णासाहेब आढाव, ग्रामपंचायत सदस्य नितीन काळंगे, सचिन वाघ, यशवंत वाघ, डॉक्टर बाळासाहेब भोसले, शामराव आढाव, हनुमंत आढाव, बलभीम आढाव, सचिन भैय्या आढाव, अक्षय जोगदंड, श्रीनिवास शेलार, वैभव आढाव, उमेश आढाव, हेमंत( गोटू )भोसले, योगेश गायकवाड, जगन्नाथ जगताप, श्याम शिंदे, तसेच भिगवन पोलीस स्टेशनचे पीएसआय जरडे साहेब, व भिगवण पोलीस स्टॉप, ग्रामस्थ तक्रारवाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सचिन आढाव, गोटू भोसले, योगेश गायकवाड, उमेश आढाव, वैभव आढाव, श्रीनिवास शेलार, अक्षय जोगदंड यांनी केले. आभार सचिन आढाव यांनी मानले.

5
2917 views