logo

Traffic Challan मेसेज आला! फसवणूक करणाऱ्यांची नवीन चाल,तुमचही होऊ शकत नुकसान

रामदास ढोरमले
पारनेर, अहिल्यनगर
Traffic Challan मेसेज आला! फसवणूक करणाऱ्यांची नवीन चाल,तुमचही होऊ शकत नुकसान
जर तुम्हालाही वाहतूक नियम मोडल्याबद्दल ऑनलाइन ट्रॅफिक चलन मिळाल्याचा मेसेज आला असेल तर लगेचच घाईगडबडीने पैसे भरू नका. सध्या सायबर गुन्हेगार नवीन पद्धतीने लोकांना गंडवत आहेत.ज्यामुळे लोकांचे बँक खाते काही सेकंदांतच रिकामे होत आहे. बेंगळुरूमध्ये नुकतीच अशी एक घटना घडली जिथे एका व्यक्तीला 70000 रुपयांचा फटका बसला.

ट्रॅफिक चलन घोटाळा कसा केला जातो
सायबर गुन्हेगार तुमच्या नंबरवर व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसद्वारे एक संदेश पाठवतात. ज्यामध्ये लिहिले असते की, “तुमच्या गाडीने वाहतूक नियम मोडले आहेत, त्यामुळे तुम्हाला चलन भरावे लागेल.” या मेसेजबरोबर एक फसवे लिंक दिलेले असते. जेव्हा तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता तेव्हा तुमच्या फोनमध्ये एक धोकादायक अॅप डाउनलोड होते.
एकदा का हे अॅप इन्स्टॉल झाले की, हॅकर्सना तुमच्या फोनचा पूर्ण अॅक्सेस मिळतो. तुमच्या बँक खात्याची माहिती, ओटीपी आणि पासवर्ड सहजपणे मिळवले जातात. यानंतर काही मिनिटांतच तुमच्या खात्यातील रक्कम गायब होते

1
179 views