logo

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा बाळभगवान शिक्षण संस्थेत कर्मचारी यांच्या वतीने शुक्रवारी सत्कारांचे आयोजन . शिरूर ताजबंद

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा बाळभगवान शिक्षण संस्थेत कर्मचारी यांच्या वतीने शुक्रवारी सत्कारांचे आयोजन . शिरूर ताजबंद ( बालाजी पडोळे ) राज्याचे सहकार मंत्री व गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री पदी निवड झाल्या बद्धल बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ अहमदपुर व शाहु शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर ताजबंद या परिवारातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्यां च्या वतीने हदयस्पर्शी सत्काराचे आयोजन येथील स्वामी विवेकानंद विद्या संकूल मध्ये शुक्रवारी दि,7 रोजी सकाळी 10:30 वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव असून सत्कार मुर्ती सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील आहेत . प्रमुख अतिथी म्हणुन शिक्षक आमदार विक्रम काळे, कृउबा अहमदपूर चे सभापती मंचकराव पाटील व सरपंच मच्छिंद्र वाघमारे यांची उपस्थिती असून बाळभगवान शिक्षण संस्थेचे जेष्ट संचालक साहेबराव जाधव, उपाध्यक्षा सौ. दिपाली अविनाश जाधव, सहसचिव अविनाश बाळासाहेब जाधव, कोषाध्यक्ष अंकुशराव कानवटे, संचालिका कुमुदिनी जाधव, संचालक सुरज बाबासाहेब पाटील प्रमुख उपस्थिती लाभणार आहे . अशी माहिती स्वागताध्यक्ष तथा सहसचिव बळीराम भिंगोले यांनी दिली . या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बाळभगवान शिक्षण प्रसारक मंडळ अहमदपूर व शाहु शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर ताजबंद यांनी केले आहे.

1
201 views