logo

*महात्मा फुले महाविद्यालय वरुड व बेस्ट इको सोल्युशन अँड टेक्नॉलॉजिस पुणे मध्ये सामंजस्य करार* *एक दिवसीय बायो-एनर्जी विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा*


श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित व तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ द्वारा संलग्नित वरुड येथील महात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुड येथे नुकतेच रसायनशास्त्र विभागाद्वारे एक दिवसीय बायो-एनर्जी या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाचा बेस्ट इको सोल्युशन अँड टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला. कार्यशाळेसाठी बेस्ट इको सोल्युशन अँड टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे चे संस्थापक डॉ.आशिष पोलकडे व डॉ.सुरज भगत हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.व्ही. हांडे यांनी भूषविले. कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय कार्यशाळा समन्वयक डॉ. अतुल वंजारी यांनी केले.
डॉ.आशिष पोलकडे यांनी पर्यावरण पूरक क्षेत्र म्हणजे ग्रीन करिअर मधील संधी या विषयावर मार्गदर्शन केले. कोणत्याही कामामध्ये यशस्वी होण्यासाठी ते काम आपण समजून करणे गरजेचे असते त्यासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडणे महत्वाचे असते असे विशद केले. त्यांनी प्रशिक्षण, उत्पादन, व्यापार, संशोधन व विकार आणि सल्लागार या सहा क्षेत्रांमध्ये १२०० हुन अधिक पर्याय उपलब्ध आहे असे सांगितले व त्याबद्दल तपशीलवार माहिती विशद केली. आजच्या विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापन क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामे करून नवीन प्रकल्प निर्माण करावे व त्यातूनच आपले भविष्य उज्वल करावे असे प्रतिपादन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या क्षेत्रात श्री.सुरज भगत यांनी करिअर, आपली जीवनशैली, कार, घर, मित्रमंडळी अश्या अनेक गोष्टीनवर प्रकाश टाकला. जीवनामध्ये करिअर मार्गदर्शन गरजेचे आहे त्यासाठी मार्गदर्शन करणारा गुरु किव्वा मेंटॉर असणे आवश्यक आहे यावर भर दिला.
कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.व्ही.हांडे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाशी निगडित आवश्यक कौशल्य प्राप्त करून घेणे व त्याचा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये उपयोग होतो याबद्दलची माहिती मिळवून त्याचा करिअर घडविण्यासाठी उपयोग करून घेणे काळाची गरज आहे असे सांगितले. ग्रीन करिअर हे शास्वत विकासाशी निगडित असल्यामुळे या क्षेत्रात भविष्यामध्ये खूप संधी उपलब्ध असतील म्हणून विद्यार्थ्यांनी ग्रीन एनर्जी या क्षेत्राकडे वळावे असे सांगितले.
कार्यशाळेमध्ये विविध महाविद्यालयातील १२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी करत उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव गुल्हाने व आभार प्रा. सतीश कोलटेंके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.आर.पी.गणोरकर, डॉ.पी.यु.बेलसरे, कंत्राटी शिक्षिका दर्शना बोरकर, साक्षी हेटे व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

45
12321 views