logo

राज्यातील प्रमाणित लेखापरिक्षकांच्या भव्य कार्यशाळेचे नाशिक येथे आयोजन...



ऑडीटर्स कौन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य, पुणे या संस्थेच्या वतीने राज्यातील सर्व प्रमाणित लेखापरीक्षक, सनदी लेखापरिक्षकांसाठी दोन दिवसीय अधिवेशन तथा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले असून, हे अधिवेशन "येत्या २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी", नाशिक नगरीत संपन्न होत असल्याची माहिती संस्थेच्या नासिक शाखेचे प्रमुख तथा राज्यव्यापी ऑडिटर वेल्फेअर या संस्थेचे खजिनदार श्री संदीप नगरकर यांनी दिली.
अधिवेशनाबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले, की, राज्यातील तमाम प्रमाणित/सनदी लेखापरीक्षकांचे सन २०२५ मधील "राज्यस्तरीय अधिवेशन व प्रशिक्षण कार्यशाळा" राज्यातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच "तपोभुमी नाशिक" येथील, बीएपीएस, श्री स्वामी नारायण मंदिर (गेट नं. २), डेन्टल कॉलेजच्या मागे, मुंबई आग्रा रोड, तपोवन, पंचवटी, नाशिक-३. या ठिकाणी संपन्न होणार आहे.
राज्यातील ऑडीटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असो. महाराष्ट्र राज्य आणि सर्व सहयोगी जिल्हा संघटना यांचे वतीने शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी व शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी नाशिक येथे हे अधिवेशन संपन्न होणार असून, या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून, मा.ना.श्री. बाबासाहेब पाटील साहेब (मंत्री, सहकार व पणन महाराष्ट्र राज्य) व राज्याचे सहकार आयुक्त मा. श्री दीपक तावरे साहेब(पुणे) हे उपस्थित राहणार आहेत.

2
2710 views