
अचलपूर उप अधीक्षक भूमिअभिलेख चा गलथान कारभार
अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देवमाळी ग्राम पंचायत हद्दीत येणारे फातिमा कॉनवेन्ट स्कूल ने अमरावती रोड लगत मौजा खेल त्र्यिंबक नारायण सर्वे नमः 47/2,47/3 मद्ये असणाऱ्या 12 मिटर रस्त्यावर अतिक्रमन केले अंतर्गत 9 मिटर रस्त्यावर तसेंच ओपन स्पेस वर अतिक्रमण केले आहे.
ओपन स्पेस मध्ये मा. बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्राम पंचायत भवन बांधकाम साठी निधी प्राप्त असल्याने ग्राम पंचायत ने अतिक्रमण काढण्यास जागेची मोजणी करण्यास दिनांक 07/02/2024 रोजी नोटीस देऊन मा. उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय यांना मोजणी करून देण्यास पत्र देऊन रीतसर कार्यालयात दिलेल्या डिमांड नुसार दिनांक 12/02/2024 ला 55 हजार रुपये भरून अद्याप सुध्दा मोजणी करून दिली नाही विशेष म्हणजे सदर प्रकरणात कोणत्याच प्रकारचे स्थानादेश नसून सुध्दा मोजणी करण्यास टाळाटाळ केली त्यामुळे अद्याप ग्राम भवन निधी परत जाण्याची वेळ आली असून उप अधीक्षक कार्यालय मोजणी का करून देत नाही हे अद्याप गुलादस्यात आल्याचे दिसते कधी मोजणी होऊन अतिक्रण निघेल आणि स्वतःची ग्राम पंचायत भवन कार्यालय मिळेल याची प्रतीक्षा ग्रामवासी करीत आहे.