logo

नाशिक मधील ब्लॉसम ॲकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचा ॲन्यूअल फंक्शन मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी १ फेब्रुवारी (नाशिक):- नाशिक मधील दत्तनगर येथील ब्लॉसम ॲकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचा ॲन्यूअल फंक्शन आज दुपारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. नाशिक त्रंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या दामोदर पॅलेस या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये जूनियर केजी पासून ते नववी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे गाणे, नृत्य तसेच प्रात्यक्षिक सादर करून दाखवले. ज्या प्रकारचे सादरीकरण असेल त्या प्रकारचा पारंपारिक पोशाख परिधान केला होता.
काही विद्यार्थ्यांनी सत्य परिस्थितीवर प्रात्यक्षिके सादर करून दाखवले. काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच मावळ्यांच्या भूमिकेमध्ये प्रात्यक्षिके करून दाखवली. विद्यार्थ्यांनी केलेल्या भूमिका तसेच सादरीकरण सर्वांच्या मनाला भावले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका पार पाडली. ही भूमिका पार पाडत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी केल्या होत्या.
या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्यक्रमाचे स्वागत उपस्थित असलेले पालक करत होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तसेच शाळेतील स्टाफ मध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले होते.

118
5754 views