logo

रवंजा (जि. जळगाव) येथे हिंदु राष्ट्र जागृती व्याख्यानाचे यशस्वी आयोजन !

महाराष्ट्र हा शिव-शंभूंना मानणार, औरगजेबावर बंदीच हवी ! - प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

जळगाव - महाराष्ट्र हा छत्रपती शिवराय आणि धर्मवीर शंभूराजे यांना आदर्श मानणारा आहे. त्यांच्या चरित्राची पारायणे आज अनेक गावात युवक करताना दिसते; पण मागील काही वर्षांत हेतुपुरस्सर औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचे पेव फुटलेले आढळुन येते. क्रूरकर्मा औरंगजेब याने हिंदूंची मंदिरे तोडली, हिंदु महिलांवर अत्याचार केले, लक्षावधी हिंदूंच्या कत्तली केल्या, धर्मवीर शंभूराजे यांची क्रूरपणे हत्या केली. अशा खुनी औरंगजेबाला महाराष्ट्रात थारा नाही. ज्याप्रमाणे इसिस, लादेन हे जिहाद करत आहेत, तसेच औरंगजेबाने तेव्हा केलेले आहे. त्यामुळे औरंगजेबाचे बॅनल फडकावण्यास राज्यात बंदी घालायला हवी, अशी परखड मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रवंजा (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र जागृती व्याख्यानात ते बोलत होते. या व्याख्यानाला श्री. जुवेकर यांच्यासह समितीच्या नाशिक जिल्हा समन्वयक कु. रागेश्री देशपांडे यांनीही संबोधित केले.

श्री. जुवेकर मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, आजच्या सेक्युलर व्यवस्थेत हिंदुबहुल देशात हिंदु धर्माचे आचरण करण्यास लाज वाटते, माझ्याकडे पाहून अन्य काय म्हणतील असा विचार हिंदु करत आहे. ही स्थिती पालटायची असेल आणि हिंदू धर्माचे आचरण उघडपणे करण्याचा अभिमान वाटावा असे वाटत असेल तर या देशात रामराज्य आणावे लागेत. अयोध्येत श्रीराम मंदिर झाले आहे आता आपल्या सर्वांना मिळून देशात रामराज्य आणण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करायचे आहेत.

समितीच्या कु. रागेश्री देशपांडे म्हणाल्या की, धर्माचणामुळे आत्मबल निर्माण होते. त्यामुळे आत्मबल संपन्न, धर्माचरणी महिला कोणत्याही प्रतिकुलतेला धीरोदात्तपणे सामोरे जाऊ शकतात. युवतींनी बॉलिवुडमधील नट्यांना आपले आदर्श न मानता आईसाहेब जिजाऊ, माता अहिल्यादेवी, राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रयत्न केल्यास त्या सक्षम होतील आणि सक्षम पिढीची निर्मिती करू शकतील.

या व्याख्यानाचा आरंभ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून झाला. समितीच्या २२ वर्षांच्या कार्याची यशस्वी घोडदौड समितीचे सह जिल्हा समन्वयक श्री. विनोद शिंदे यांनी मांडली. सूत्रसंचालन समितीचे श्री. जितेंद्र चौधरी यांनी केले. व्याख्यानाला गावाचे सरपंच श्री. नामदेव माळी, पोलीस पाटील सौ. शर्वरी चौधरी यांसह अनेक मान्यवर पूर्ण वेळ उपस्थित होते. व्याख्यानाला लाभ ८०० हून अधिक धर्मप्रेमी बांधवांनी घेतला.

वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे :
१. व्याख्यानाचा प्रसार करण्यासाठी गावात आयोजित निमंत्रण फेरीत १०० हून अधिक धर्मप्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
२. व्याख्यानाला महिलांची उपस्थिती लक्षणीय म्हणजे जवळपास ४०० हून अधिक होती. सर्व घरातील स्वयंपाक लवकर करून व्याख्यानाला पूर्ण वेळ उपस्थित राहिल्या होत्या.
३. व्याख्यानासाठी गावातील धर्मप्रेमी बांधवांनी व्यासपीठ, टेन्ट, ध्वनी, लाईट, तसेच विद्युत जनित्र आदी सर्व साहित्य धर्मसेवा म्हणून उपलब्ध करून दिले.
४. व्याख्यान झाल्यावर लगेचच गावातील धर्मप्रेमी युवकांनी सरपंचांकडे गावात ‘हिंदु राष्ट्र - रवंजा’ असा वार्ताफलक बनवण्याची अनुमती मागितली आणि येत्या शिवजयंतीला असा वार्ताफलक गावात तयात करण्याचा निश्यच केला.


बुधवारी हिंदु राष्ट्र नियोजन बैठकीचे आयोजन !

व्याख्यानाला आलेल्या धर्मप्रेमी बांधवांचे हिंदु राष्ट्राच्या कार्यात पुढील नियोजन करण्यासाठी समितीच्या वतीने येत्या बुधवारी म्हणजे २९ जानेवारी या दिवशी सायं. ६ वाजता गावातील श्री मारूती मंदिरात हिंदु राष्ट्र नियोजन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला अधिकाधिक धर्मप्रेमी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृति समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

11
573 views