मतिमंद विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करून वाढदिवस उत्साहात......
( जि.भंडारा ) तुमसर, दि. २८/०२/२०२५ ला लुंबिणी मतिमंद बालगृहातील विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. राईस सिटी करिअर अकॅडमी पोलीस व सैन्य प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा गोटूल बहुउद्देशीय फाउंडेशन चे संचालक श्री. दीपक सराटे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला. यावेळी "लुंबिणी मतिमंद बालगृहाचे गृहपाल " देशभ्रतार सर, "महाराष्ट्र नवनिर्माण सेना " चे पदाधिकारी तालुका अध्यक्ष- ईशानजी शेंद्रे, शहर अध्यक्ष- निखिलजी कटारे, शहर उपाध्यक्ष- पुष्पकजी त्रिभुवनकर, सामाजिक कार्यकर्ता- रोशन ढोके, तालुका उपाध्यक्ष- स्वप्निल बुराडे, आशिष शहारे, विभाग अध्यक्ष जितू भवसागर विभाग अध्यक्ष मनीष गूर्वे, विभाग अध्यक्ष- सागरजी शनीचरे, विकास प्रजापती, महेश इनवते, सह विद्यार्थी उपस्थित होते.