logo

व्यक्तीचे सारे आयुष्यच आरोग्यसंपन्न अन् सुखकर जावे, यासाठी धर्मशास्त्राने आहारविषयी नियम सांगितले आहेत; परंतु गेल्या काही वर्षांत धर्मशास्त्राचे महत्त्व विसरल्यामुळे आपण ते नियम डावलले.

व्यक्तीचे सारे आयुष्यच आरोग्यसंपन्न अन् सुखकर जावे, यासाठी धर्मशास्त्राने आहारविषयी नियम सांगितले आहेत; परंतु गेल्या काही वर्षांत धर्मशास्त्राचे महत्त्व विसरल्यामुळे आपण ते नियम डावलले.

यांतील काही नियम आणि त्यांमागील धर्मशास्त्र या ग्रंथात उद्धृत केले आहे. हे नियम जर आपण काटेकोरपणे पाळले, तर प्रकृतीच्या कारणास्तव आपल्याला डॉक्टरांकडे किंवा वैद्यांकडे जायची आवश्यकताच भासणार नाही.

असा कुठलाही आजार नाही जो आहाराच्या माध्यमातून बरा होत नाही, परंतु बऱ्याच वेळी आपणास आहारात काय घ्यावे हे माहीत असते पण ते कधी व किती प्रमाणात घ्यावे या बद्दल कल्पना नसते. आहार योग्य वेळी योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न आपणास पोषण देईल.

आपले शरीर अॅक्टिव्ह आणि निरोगी ठेवण्यासाठी हेल्दी आहार आवश्यक असतो. पण फक्त खाद्यपदार्थ जेवणाला हेल्दी बनवत नाहीत. हेल्दी अन्नपदार्थ म्हणजे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाणे. अशा स्थितीत खाण्याचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करून तुम्ही तुमचे आरोग्य निरोगी व मजबूत राखू शकता.

आहाराचे नियम:-

नियम 1 : आपल्या पोटाचे तीन भाग करावेत . त्यातील एक भाग हे घन आहारासाठी ठेवावा , एक भाग हा जलासाठी ठेवावा आणि उर्वरित एक भाग हा वायुभ्रमणासाठी रिकामा ठेवावा , जेणेकरून आहार हा सुयोग्यरीत्या पचविला जातो . आहार हा योग्य रीतीने पचला , तरच त्यातील पोषकांश शरीराला लाभतात आणि स्वास्थ्य टिकून राहते.

नियम 2: सकाळी उठल्याबरोबर अर्धा ते एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे . लिंबाचा रस हा थेट आपल्या पचनशक्तीवर कार्य करतो आणि जुनाट पित्त , तसेच मलबद्धता इत्यादी पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी कमी करतो.

नियम 3: जेवणाआधी आर्धा तास एक ग्लास पाणी प्यावे आणि जेवणाच्या मध्ये मध्ये एखादा घोट पाण्याचा प्यावा . त्यामुळे आहार हा सुयोग्य रीतीने पचविला जातो.

नियम 4 : कोणतेही फळ हे जेवणाच्या अगदी अगोदर किंवा नंतर घेऊ नये . अस वारंवार केल्यास मळमळणे , वा छातीत जळजळणे सुरू होते , तसेच फळांमधील पोषक तत्वे योग्य प्रमाणात शोषिले जात नाही. कारण दोन्हींच्या पचनाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत.

नियम 5 : अतिशय घाईघाईने अथवा अतिशय हळू जेवू नये . पचनसंस्थेवर विपरीत प्रभाव पडतो.

नियम 6 : दुपारी जेवणानंतर लगेचच झोपू नये . असे वारंवार केले गेल्यास अवाजवी स्थूलता वाढते आणि पचनही बिघडते.

नियम 7 : दुपारचे जेवण हे सकाळच्या जेवणापेक्षा थोडे कमी असावे, मात्र रात्रीचे जेवण हे लघू असावे आणि सूर्यास्तापूर्वी किंवा लवकरात लवकर ग्रहण करावे . रात्री खूप उशिरा जेवल्याने पचनप्रक्रिया मंदावते आणि एक एक व्याधी लक्षणे दिसून येतात.

रात्रीचे जेवण उशिरा खाणे ही आजकाल फॅशन बनली आहे. पण असे केल्याने तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. कारण जसजसे तुमचे शरीर रात्री विश्रांतीसाठी तयार होते, तसतशी आपली पचनक्रिया मंदावते. यामुळे तुम्ही खाल्लेल्या कॅलरीज चरबीच्या रूपात शरीरात साठवल्या जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे झोपण्यापूर्वी व रात्री उशीरा खाणे टाळा. झोपण्याच्या 3/4 तास आधी जेवण्याचा प्रयत्न करा.

नियम 8 : आहार हा ताजा बनवलेला . फ्रिजमधील थंड नसावा . तसेच फ्रिजमधील पाणी आणि बर्फाने शरीरातील उष्णता वाढते.

नियम 9: पहिला सेवन केलेला आहार जोपर्यंत पचत नाही , म्हणजेच कडकडून भूक लागत नाही तोवर पुढील आहार घेऊ नये . असे न केल्याने पचनाच्या तक्रारी सुरू होऊन इतर आजारांनादेखील कारणीभूत ठरू शकते. दोन जेवणांमध्ये चार तासांचे अंतर असावे.

नियम 10 : प्रत्येक जेवणानंतर अर्धी वाटी ताक प्यावे . त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते.

नियम 11 : रोजच्या आहारामध्ये तूप हे चार चमचे प्रत्येकी घ्यावे . ( केवळ फोडणीपुरते नाही ) तूप हे पाचक अग्नीस प्रदीप्त करते , प्रतिकार शक्ती कायम ठेवते , तसेच ते एक उत्तम रसायनदेखील आहे . शक्यतो गाईचे तूप हे उत्तम , मात्र घरी बनवलेले म्हशीचे तूपदेखील उत्तम असते.

नियम 12: दूध आणि फळे एकत्र करून घेऊ नये . जसे फ्रुट कस्टर्ड , शिकरण . असे सवयीने वारंवार खाण्यात आले तर त्वचा रोगनिर्मिती होण्यास कारणीभूत ठरू शकते.

नियम 13 : अतिकोरडे , अतितेलकट , अतिगरम , अतिशीत , अतिस्निग्ध असा आहार नसावा . सर्व प्रमाणात सेवन केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते . आहार नियमानुसार जर आपला दैनंदिन आहार जपला , तर निश्चितच आरोग्य हे उत्तमच राहणार .

संकलन-
उपचार व आहार तज्ञ
डॉ. हुजेफा(सांगली)
संपर्क - 8446674786

0
60 views