सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श पंचायत
प्रतिनिधी - कालचा दिवस रविवार 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिन, गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायतीचे सरपंच मा. सुभाष लाड यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श डिकवल गाव म्हणून निवडण्यात आलेल्या गावातील देव गंगेश्वर रंगमंच सभामंडप येथे ग्रामसंवाद सभेने दणाणला.
या सभेत मा. सुभाष लाड याच्या सोबत उपसरपंच मा. साबाजी गावडे सर ईत्यादी सर्व ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते. गोळवण-कुमामे-डिकवल गावातील सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने हजर झाले होते.
मा. सरपंच सुभाष लाड यांनी सभेत ग्रामस्थांना आदर्श गावासाठीच्या भविष्यातल्या होवू घातलेल्या कामांसाठीचे मार्गदर्शन करून ग्रामस्थांच्या प्रश्नांची उत्तरे देवून सभा गाजवली.