logo

परतूर येथे घरगुती वापराचा गॅस वाहनात भरून अवैध विक्री करीत असताना परतूर पोलिसांनी मारला छापा ; छापा मारून ५ ऑटो रिक्षा , फिलिंग मशीन आणि ६ LPGसिलेंडर असा एकूण ५,२३,४००/-₹ चा मुद्देमाल केला जप्त.

परतूर येथे घरगुती वापराचा गॅस वाहनात भरून अवैध विक्री करीत असताना परतूर पोलिसांनी मारला छापा ;
छापा मारून ५ ऑटो रिक्षा , फिलिंग मशीन आणि ६ LPGसिलेंडर असा एकूण ५,२३,४००/-₹ चा मुद्देमाल केला जप्त.

परतूर (प्रतिनिधि) :-
भाऊसाहेब पाटिल मुके :-

दिनांक २६/०१/२५ रोजी परतूर पोलिसांना माहिती मिळाली की, स्टेडियम येथे खाजगी वापराचा गॅस लाल सिलेंडर मधून प्रेशर मशीन चे मदतीने वाहनात LPG गॅस भरताना मिळून आल्याने अचानक चापा मारून पकडले असता त्या ठिकाणी ५ ऑटो रिक्षा, ६ लाल LPG गॅस सिलेंडर, प्रेशर मशीन, मोटार, वजन काटा असा ५,२३,४००/-₹ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यावेळी आरोपी आली हसन मोहमदी,
ऑटो चालक अहमद हबीब शेख, सह सय्यद महबूब सय्यद चांद, सुनील विठ्ठलराव मोहिते, सय्यद सलीम समद यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. श्री. अजय कुमार बंसल, साहेब, पोलिस अधीक्षक जालना, मा. श्री. आयुष नोपाणी, साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक जालना, मा. श्री. दादहरी चौरे, साहेब, उप विभागीय पोलिस अधिकारी, परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली
एम.टी.सुरवसे, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन परतूर, विठ्ठल केंद्रे, पो उप निरिक्षक,
पो.हे.कॉ अशोक गाढवे, पो. कॉ. शामुल गायकवाड, पो.कॉ. ज्ञानेशोर वाघ, पो. कॉ. सतीश जाधव,
चालक / पो. कॉ. स्वप्नील फंड यांनी केली आहे.

295
7787 views