
Manoj Jarange Patil यांच्या सोबत परतूर च्या तीन तर मंठा तील एकाचे आमरण उपोषण सुरु.
जरांगे पटलांसोबत परतूर च्या तीन तर मंठा तील एकाचे आमरण उपोषण सुरु.
परतूर (वा.) :-
गरजवंत मराठा आंदोलनाचे नेते संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दि. 25 जानेवारी पासून अंतरवालीत सामूहिक उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी जरांगे पाटिल यांनी सुरु केलेल्या सामूहिक आमरण उपोषणात परतूर येथील सचिन खरात पाटिल, भाऊसाहेब पाटिल मुके व रामेश्वर देशमुख हे तीघे जण तसेच मंठा तालुक्यातील नाना खंदारे आमरण उपोषणास बसलेले आहेत.
याप्रसंगी महाराष्ट्रातील गावागावातील सर्व मराठा बांधवांनी आपल्या लेकरां च्या भविष्यासाठी एकजूट व्हा. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण मराठ्यांनी एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणाला साथ देण्यासाठी अंतवालीत या ”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
“जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही. तोपर्यंत हे उपोषण चालणार आहे. आता हे शेवटचे आमरण उपोषण असणार असून जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे. तोपर्यंत आता माघार घेणार नाही. आणि यावर मी ठाम आहे.
‘कोणीही आलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही’
“हे आता सामूहिक आमरण उपोषण आहे. एकाच दिवशी एकाच वेळी अंतरवाली सराटी मध्ये अनेकजण सामूहिक आमरण उपोषणाला बसलेले आहे. त्यामुळे मला ही डबल ऊर्जा आली आहे. पटलांची हवा कमी झाली असे म्हणणाऱ्यांनी अंतरवालीत येऊन पाहावे.
चौकट
गरजवंत मराठा समाजाला सरकार ने आजपर्यंत आरक्षणाच्या नावावर फसवलेले आहे. सरकार ने मनोज दादांच्या या सामूहिक आमरण उपोषणाची त्वरित दाखल घ्यावी. आता सुरु असलेले हे सामूहिक आमरण उपोषण सुरु आहे. जो पर्यंत मनोज दादा आमरण उपोषण करतील तो पर्यंत आम्हीही आमरण उपोषण करणार असल्याचे खरात, मुके व मंठा तालुक्यातील नाना खंदारे यांनी संगितले.