logo

नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात ध्वजारोहण संपन्न....

अडावद ता चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दि 26 जानेवारी 2025 रोजी 76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयाचे प्रयोगशाळा परिचर श्री पी एच घाटे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे आरोहन करण्यात आले, तर स्काऊट गाईड ध्वजाचे आरोहन विद्यालयाचे उपप्राचार्य श्री एस के भंगाळे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पवार सर, पर्यवेक्षक श्री के आर कनखरे सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री डी जी पाटील सर, सेवानिवृत्त शिक्षक श्री डी ए वाणी सर, अडावदच्या उपसरपंच सौ कुसुमताई मनोहर पाटील,गावातील पत्रकार बंधू, अडावद गावातील प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, माजी विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होते. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींनी लेझीम पथक व झांज पथकाचे उत्कृष्ट संचलन केले. इ 9वी च्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर करून प्रेक्षकांची मने आकर्षित करून घेतली. गावातून प्रभात फेरी काढून ग्रामपंचायत कार्यालयाजवळ झांज पथक लेझीम पथक व देशभक्तीपर गीताचे सादरीकरण करण्यात आले. सदर पथकाला व गीताला गावातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रोख स्वरूपाचे बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. झांज पथक व लेझीम पथकाला श्री डी एम सोनवणे सर यांनी मार्गदर्शन केले होते, देशभक्तीपर गीताला श्री एस ए सावळे सर यांनी मार्गदर्शन केले होते. ग्रामपंचायत कार्यालयाकडून आल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेण्यात आली. "प्रजासत्ताक दिन " व "माझा संविधान-माझा अधिकार " यापैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लेखन घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री के आर कणखरे सर श्री सी जी परदेशी सर व श्री बी के साळुंखे सर यांनी केले. सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे सहकार्य मिळाले.

35
4915 views