logo

श्री सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोलारा येथे माता पालक मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न:

दिनांक 25 जानेवारी 2025, वार- शनिवार रोजी ,श्री सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोलारा येथे माता पालक मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सौ.कल्पना पंढरीनाथ सोळंकी यांनी भुषविले. प्रमुख उपस्थिती गावच्या महिला सरपंच सौ. वनिताताई रामेश्वर सोळंकी यांची होती. तर प्रमुख वक्ता म्हणून डॉ.सौ. संध्या विजय कोठारी (स्त्री रोग तज्ञ) चिखली यांची उपस्थिती लाभली होती. माता सरस्वती चे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले. यानंतर डॉ. कोठारी मॅडम यांनी मुलींना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले, त्यासोबतच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माता पालकांनी आपल्या मुलींची या काळामध्ये घ्यावयाची विशेष काळजी संदर्भामध्ये मार्गदर्शन केले. त्यासोबतच महिलांनीसुद्धा आपल्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे असे सुचविले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ .मनीषा पाटील मॅडम यांनी केले ,तर सूत्रसंचालन वर्ग नववीच्या विद्यार्थिनी कु. स्नेहा मघाडे व कु. मयुरी सोळंकी ह्यांनी केले. सदर कार्यक्रमांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .त्यासोबतच महिलांसाठी हळदीकुंकवानिमित्त विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये संगीत खुर्ची ,एक मिनिट स्पर्धा, उखाणे स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या महिलांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला 107 महिला उपस्थित होत्या. उपस्थित असलेल्या सर्व महिलांना हळदीकुंकू, तिळगुळ व भेटवस्तू विद्यालयाच्या वतीने देण्यात आली. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. उर्मिला परसने हिने केले. कार्यक्रमाचे आयोजन सौ.मनिषा पाटील मॅडम यांनी केले होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री . नालींदे सर,प्राध्यापक श्री. सरकटे सर, श्री. चंचरे सर, श्री. राठोड सर, श्री. देशपांडे सर, श्री. भालेराव सर, प्रा.श्री. शेजोळ सर, प्रा. श्री.गणेश सोळंकी सर, श्री. घेवंदे सर, कु. मेथे मॅडम, कु. सुरडकर मॅडम, भरत दादा साखरे, किशोर दादा जाधव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य श्री. गणेशजी नालींदे सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांची उपस्थिती होती.

11
4130 views