logo

वाफेगाव चे शेतकरी शहाजी गाडे यांचा 26 जानेवारी 2025 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा

लवंग चे संजय फिरमेमंडल अधिकारी, यांनी,शेतीच्या कागदपत्रात हेराफेरी करून शेतकऱ्यांना त्रास देत आहेत म्हणून... वाफेगावचे शेतकरी शहाजी गाडे 26 जानेवारी 2025 रोजी आत्मदहन करणार
लवंग... लवंगचे मंडलाधिकारी शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊन शेतकऱ्यांची कोणतीही काम, वेळेवर, विना मोबदला करत नाहीत, शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत कागदपत्रांची फेराफेरी करत आहेत आणि अमाप अशी संपत्ती प्रचंड अशी संपत्ती जमा करत आहेत, त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून वाफे गावचे शेतकरी शहाजी गाडे हे 26 जानेवारी 2025 रोजी माननीय प्रांताधिकारी कार्यालय अकलूज यांच्यासमोर आत्मदहन करणार आहेत, यांची वडीलोपार्जित जमीन गट नंबर 87 ही वाफेगाव मध्ये आहे, जमिनीला येण्या जाण्यासाठी जुना पानंद रस्ता असून ,तो पानंद रस्ता, काही लोकांनी अतिक्रमणित केलेला आहे याशिवाय वाफेगाव ग्रामपंचायतीने हीत्या रस्त्यावरती अतिक्रमण केलेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना वहिवाटी साठी आपला बैल बारदाना मेहनती साठी लागणारा ट्रॅक्टर, शेतामध्ये घेऊन जाता येत नाही, पूर्वीचे मंडल अधिकारी यांनी रीतसर मोजणी व नकाशे पाहून या पानंद, रस्त्यावर ज्याने अतिक्रमण केले त्यांना रीतसर नोटीसा बजावल्या होत्या, त्यानुसार पुढे कार्यवाही व्हावी एवढीच मापक मागणी गाडे,नी केली होती, त्यांनी कधीही स्थळ पाणी केलेली नाही आणि बोगस रिपोर्ट तयार करून दप्तरी ठेवलेला आहे कोणतही काम त्यांनी केलेले नाही उलट नाहक त्रास देण्याचे काम ते करत आहेत म्हणून यांची, खातेनिहाय चौकशी करून समस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी गाडे हे आत्मदहन करणार आहेत

25
3093 views