
विषय :-पुणे शहरातील वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी हे आपल्या कर्तव्यचे पालन करत नाहीत असे आढळून येत आहे.राष्ट्रवादी काँगेस वाहतूक विभाग आक्रमक.
पुणे शहरातील वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी आपले कर्तव्यचे पालन करत नाही, ठीक ठिकाणी पुणे शहरात विनाकारण दोन चाकी तसेच चार चाकी वाहन पार्क केली जात असून वाहतीकीला अडथळा निर्माण करत आहेत, पुणे स्टेशन, स्वारगेट बस्टॉप, शिवाजी नगर बस्टॉप या ठिकाणी प्रायव्हेट कार बेकायदेशीर सीट वाहतुकीचा व्यवसाय चालवत आहेत, हे वाहतूक विभाग पोलीस यांना माहित असून सुद्धा हा व्यवसाय सुरूच आहे याचे कारण काय याला भ्रस्टाचार समझने चुकीचे नाही, पूना क्लब विधानभवन रोड या ठिकाणीही चार चाकी पार्क केली जाते याकडेही लक्ष नाही, या करिता राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक विभाग (अजित दादा पवार गट )पुणे जिल्हा यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग यांना अर्ज केला असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, तसेच वाहतूक विभागाच्या पोलीस स्टेशनं ला अधिकारी उपस्तित नसतात हे काय डिवटी करतात आणि कुठे करतात, पुणे शहरातील सिग्नल ला सुद्धा अधिकारी उपस्तित नसतात, चौकाच्या कान्याकोपऱ्यात बसून आपल्या मोबाईलवर विडिओ गेम आणि रील्स बघत टाईमपास करतात असे आढळून आले,या कारणास्तव पुणे जिल्हाध्यक्ष अहमद सय्यद तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव अब्दुल अजीज खान, पुणे शराध्यक्ष अमोलसिंग ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश सदस्य अजरोद्दीन शेख व पदाधिकारी यांनी पुणे शहर वाहतूक विभाग बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्याच्या विरुद्ध आंदोलन करण्या करिता बैठाका घेत आहेत,जेणेकरून वाहतुकीचे आदिअडचणी दूर होण्यास मदत होईल आणि पुणे शहर वाहतूक पोलीस झोपेतून जागे होतील.