logo

शिरूर तालुक्यातील सादलगाव ह्या ठिकाणी घरफोडी चोरी....

सादलगाव येथे घरफोडी लाखांचा ऐवज लंपास
शिरूर प्रतिनिधी - रमेश बनसोडे
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा पोलीस चौकीच्या हद्दीतील सादलगाव
येथे घरफोडी सोने पैसे लाखाच्या स्वरूपात चोरी झाले.सदर घटनेची तक्रार मांडवगण फराटा पोलीस चौकीत करण्यात आली आहे.फिर्यादी नंदकुमार भगवान जठार व झुंबरबाई गणपत साळुंके यांच्या तक्रारीत म्हटले की सुमारे रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान दुसऱ्या घराच्या खोलीत कपाट उघडण्याचा आवाज ऐकू आला.मी माझी पत्नी त्याच खोलीच्या शेजारी झोपलो होतो. चोरीचा संशय आला असता. आम्हीं बाहेर येयला लागलो पण बाहेरून चोरांनी कडी लावली असे कळले.लगेच मी भावाला फोन करून चोर आल्याचे कळवले.पण अगदी त्याचवेळी आजूबाजूच्या घरांच्या दरवाजाच्या कड्या लावल्या होत्या.भावाला समजताच भावाने दार उघडले.आम्ही सर्व दुसऱ्या खोलीत गेलो.दरवाजाची कडी तुटलेली दिसली.कपड्यांचे कपाट उघडलेले दिसले.कपडे खाली पडलेले होते.कपाटाच्या तिजोरीतील पैसे.सोने असे ऐवज चोरी झाल्याचे कळले.(चोरीमध्ये 43.340 ग्रॅम वजनाचे गंठण - रू 299740
सोन्याच्या बांगड्या- रू 140420.
सोन्याची चेन - 15.410 ग्रॅम - रू 107870
सोन्याची खड्याची अंगठी - 6 ग्रॅम - रू 42000
सोन्याची अंगठी - 4 ग्रॅम - रू 28000
सोन्याची अंगठी - 6.250 ग्रॅम - रू 43750
असे एकुण जवळ जवळ 661780 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असे तक्रार मध्ये नमूद केले गेले आहे.
( सह्याद्रीच्या राखणदार प्रतिनिधीशी - रमेश बनसोडे ) बोलताना नंदकुमार भगवान जठार बोलले की चोरी करणारा आरोपी हा गवाचाच आहे असे अनेक ग्रामस्थ नागरिकांचे म्हणणे आहे.पण तो पोलिसांनी शोधून काढावा अशी मागणी दोन्ही कुटुंबाकडून
करण्यात आली आहे.ह्या चोरीचा तपास संदेश केजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल गवळी.हवालदार अशोक शिंदे.पोलीस आमलदार ए. एस. आई कदम.पोलीस आमलदार बाबर.पोलीस आमलादर टेंगले हे पाहत आहे...

5
4371 views