ढकांबे येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन
दिंडोरी - परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, चाईल्ड सव्हाईवल इंडिया व ग्रामपंचायत ढकांबे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर वार बुधवार दिनांक 22/01/2025 या दिवशी आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये 104 नागरिकांनी मोफत डोळ्यांची तपासणी करून घेतली .या प्रसंगी ग्रामपंचायत तिसगाव येथील सरपंच मनीषा पोटिंदे, उपसरपंच शरद बोडके ग्रामसेवक रमेश राख शिपाई हिरामण वायकांडे, उपकेंद्राचे सी एच ओ प्रिंयंका बावस्कर,आशासेविका सारिका सोनवणे व शारदा जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले .
यावेळी चाइल्ड सर्व्हायव्हल इंडिया (दिंडोरी) या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र अहिरे, मेडिकल ऑफिसर डॉ.अनुजा जाधव ,फार्मासिस्ट राकेश ढाकणे,आरोग्य शिक्षक कृष्णा पवार व नंदिनी चौधरी,डाटा ऑपरेटर मेघा गायकवाड,आणि अजय तासकर व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक येथील ऑप्टोमेट्रिस्ट गोविंद माने आदी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.