मुक्ताईनगर येथे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसेंकडून संविधान ७५ दिनदर्शिकेचे अवलोकन
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसेंकडून संविधान ७५ दिनदर्शिकेचे अवलोकन केले
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळीच्या निवासस्थानी डॉ. केतकी पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हे वर्ष संविधान पर्व असल्याचे सांगितले तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घर घर संविधान असे विधान केले आहे. त्यानिमित्त संविधान दिनदर्शिका तयार केली असून त्याचे वितरण सुरु झाले आहे. आज मंगळवार दिनांक २१ जानेवारी रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील निवास्थानी जाऊन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना रक्षा ताई खडसे यांची भेट घेतली. या प्रसंगी संविधानाला अनुसरून तयार केलेली संविधान ७५ दिनदर्शिका भेट दिली. या प्रसंगी दिनदर्शिकेचे अवलोकन करून अभ्यास पूर्ण दिनदर्शिकेची निमिर्ती असल्याचे ना.रक्षा ताई म्हणाल्या. तसेच दिल्लीत देखील दिनदर्शिका घेऊन जाणार असे आश्वासन ना रक्षाताई खडसे यांनी दिले.