logo

भाजप महिला मोर्चा आघाडीतर्फे सावनेर येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

नागपूर सावनेर
प्रतिनिधी चंदू मडावी
काल दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आघाडी, सावनेर यांच्या वतीने आयोजित भव्य हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रम च्या प्रमुख पाहुण्या आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या सौभाग्यवती डॉ. आयुश्री आशीषराव देशमुख ह्या होत्या त्यांनी त्यांनी सर्व महिलांना हळदी कुंकू च तिलक लावले.त्यांनी आपल्या संभाषणात महिला ही अबला नसून सबला आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, आता माझा परिवार छोटा सा नसून हा सम्पूर्ण सावनेर कलमेश्वर विधानसभा आमचा परिवार आहे ,संपूर्ण विधानसभा च्या विकासासाठी कटीबद्ध आहोत, लवकरच सखी मंच सारखे माऊली नावाने आपण आपल्या सावनेर कलमेश्वर विधानसभा च्या महिलांनासाठी मंच ची उभारणी करू असे म्हटले. या प्रसंगी विद्याताई सिंग. ज्योती कांबळे भारतीय मोर्चा महिला अध्यक्ष वैशाली चापले सोनी राऊत मालती रामटेके चित्रा उईके रेखा धार्मिक अनिता बेलवंशी कमला यादव प्रतिभा वालके विमल पटले हेमा गोडबोले भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

108
8826 views