किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम साहेब यांचे कनकी येथे स्वागत.
किनवट - कनकी :- किनवट मोहन विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमरावजी केराम साहेब कणकी गावात फुलाजी बाबा यांच्या वर्धापन दिनाच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमानिमित्त आले अस्ता. त्यांचे स्वागत कणकी येथील पवन जयस्वाल यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री व्यंकट रेड्डी चिल्कुलवार भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश बद्दीवार व संजय रेड्डी येलटीवार उपस्थित होते. आमदार साहेब हा कार्यक्रम आटोपून पवन जयस्वाल यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली व कणकीच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले यावेळेस गावचे सरपंच सुदर्शन जी आत्राम व उपसरपंच विनोद राठोड व भाजपाचे कार्यकर्ते मनीष पवार दिनेश राठोड भारत राठोड अशोक राठोड व संजय बाडगुरे आकाश पेटकुले तथा सर्व कणकी येथील भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.