logo

*पुणे महानगरपालिकेच्या उपशिक्षिका श्रीम. शुभांगी लोखंडे यांना राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान*

*पुणे महानगरपालिकेच्या उपशिक्षिका श्रीम. शुभांगी लोखंडे यांना राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान*
*पुणे महानगरपालिकेच्या उपशिक्षिका श्रीम. शुभांगी लोखंडे यांना राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान*

पुणे: नवी दिशा- नवे उपक्रम या राज्यस्तरीय शैक्षणिक समूहाच्या वतीने दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी अहिल्यानगर येथे "नवे दिशा व नवे उपक्रम-भाग-3" पुस्तक प्रकाशन सोहळा व महाराष्ट्रातील गुणवंत शिक्षकांना राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार-2025 वितरण सोहळा अतिशय आनंदात, दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला.
यामध्ये उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्याची समूहातर्फे दखल घेऊन पुणे महानगरपालिकेच्या म.न.पा. शाळा क्रमांक १२७ मुलांची, येरवडा, पुणे-०६ या शाळेच्या उपशिक्षिका श्रीम.शुभांगी शंकर लोखंडे यांना उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावर्षी महाराष्ट्रातील 30 उपक्रम शिक्षकांच्या विविध नवपक्रमांची दखल घेऊन त्यांनी प्रत्यक्ष वर्गात राबवलेल्या विविध उपक्रमातून उत्कृष्ट उपक्रमाची निवड करण्यात आली.'नवे दिशा-नवे उपक्रम'भाग -३ उपक्रमांचे पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सुप्रसिद्ध रानकवी श्री तुकाराम धांडे (रानवेडी कवितेचे कवी) व प्रसिद्ध लेखिका मा. अंजलीताई अत्रे (मीठाचा शोध या पाठाच्या लेखिका),निसर्ग पर्यावरण मंडळाचे श्री.मोरे सर, समूह प्रशासक श्री.देवराम चव्हाण सर ,समूह प्रमुख श्री .बळीराम जाधव सर यांच्या उपस्थित 'गुणवंत उपक्रमशील शिक्षक पुरस्काराचे' वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यामध्ये उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमाची दखल घेऊन मान्यवरांच्या हस्ते श्रीम.शुभांगी लोखंडे यांना गुणवंत राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार-२०२५ ने सन्मानित करण्यात आले.त्यांनी इंग्रजी विषयाबद्दलचा नाविन्यपूर्ण उपक्रम यामध्ये सादर केलेला आहे.
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,पुष्पगुच्छ, तुळशीचे रोप,नवे दिशा -नवे उपक्रमभाग -३ पुस्तकाच्या प्रती असे पुरस्काराचे आकर्षक स्वरूप होते.
अतिशय शिस्तबद्ध, नियोजनबद्ध वातावरणामध्ये सदर राज्यस्तरीय गुणवंत उपक्रमशील पुरस्कार २०२५ वितरण सोहळा संपन्न झाला.

12
4038 views