logo

तिसंगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न



परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, चाईल्ड सव्हाईवल इंडिया व ग्रामपंचायत तिसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत अस्थिरोग (हाडांची) तपासणी शिबिर वार सोमवार दिनांक 20/01/2025 या दिवशी आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये 47 नागरिकांनी मोफत तपासणी करून घेतली .या प्रसंगी ग्रामपंचायत तिसगाव येथील सरपंच समृद्धी भालेराव, उपसरपंच किशोर बागुल ग्रामसेवक ए. ए. सय्यद शिपाई सुकदेव खैरनार सदस्य, आशासेविका सारिका शिरसाठ अंगणवाडी सेविका गायत्री शिरसाठ आणि मनीषा बागुल यांचे विशेष सहकार्य लाभले .यावेळी चाइल्ड सर्व्हायव्हल इंडिया (दिंडोरी) या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र अहिरे, मेडिकल ऑफिसर डॉ.अमोल येवला,फार्मासिस्ट ऋषिकेश गावडे ,आरोग्य Educator तुषार साबळे व महिमा सोनवणे,डाटा ऑपरेटर निशा पवार,आणि देविदास निकम व सनशाइन क्लिनिक नाशिक येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.गणेश आहेर आदी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

6
1005 views