logo

किनवट - सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाची किनवट आगाराची सन 2025 सालाची कार्यकारणी जल्लोषात.

नांदेड /किनवट - मा. आमदार गोपीचंद पडळकर साहेब, मा. आमदार सदाभाऊ खोत साहेब,किनवट, माहूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या मार्गदर्शनाने मा.सतीश मेटकरी ( सरचिटणीस ) मा.प्रकाश कांबळे ( केंद्रीय उपाध्यक्ष) पद्मश्री राजे ( केंद्रीय उपाध्यक्ष) मा.अशोक वजीरगावे ( केंद्रीय नेते ) मा.पंढरी कोंकेवाड ( केंद्रीय सदस्य) यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन किनवट आगाराची
सण 2025 ची सर्वसाधारण बैठकीत सर्वांनुमते कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली.
सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ किनवट आगाराची सर्वसाधारण बैठक शेतकरी निवास किनवट येथे दिनांक 19/01/2025 रोजी वरिष्ठ मार्गदर्शक श्री. दत्तात्रय पालेपवाड यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात पार पडली असुन श्री. अंकुश चव्हाण यांची अध्यक्षपदी तर सचिव पदी विलास खिलारे, वसंत पिठलेवार -कार्याध्यक्ष,प्रमुख मार्गदर्शक अमनभाऊ कुंडगीर, दत्ता पालेपवाड, कोषाध्यक्ष उत्तम राठोड, सहसचिव प्रवीण आईटवार व राजु राठोड, उपाध्यक्ष गुरुसिंग ठाकूर, जनार्धन दुधमल, अनिल जाधव, लक्ष्मण पलीकोंडावार, संघटक सचिव - राजकुमार खुडे, अनिल पांचाळ सहसचिव - डी एन वेट्टी, पी,बी बारापात्रे, वी.व्ही वाघमारे, खजिनदार- सतीश डांगे, विभागीय उपाध्यक्ष- गंगाधर कानुरे, आणि प्रसिद्ध प्रमुख मनोज पुसनाके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीस अर्जुन जायभाय,रवी गनोजवार, रमेश शेरपुरवार, एस आर जाधव, उमाकांत गडलवाड, पांडुरंग कोंकेवाड, श्रीनिवास लच्छेट्टीवार, रवी निळेकर, लक्ष्मण व्यवहारे, कैलास मेटकर, धनराज खांडेकर, अनिल गंगाधरे, गजानन चंद्रे, सिद्धार्थ गच्चे, बालाजी शिंगणे, संतोष खंडगावकर, हरिभाऊ पारधी, संजू कदम, विशाल पानपत्ते, आत्तार भाई, श्रीरंग निलेवाड, छगन तलांडे, संजय शिडाम, अंकुश राठोड, सागर पलीकोंडावार, यांच्यासह अनेक कर्मचारी उपलब्ध होते व सर्वांनी नवीन निर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पुसनाके, आभार वसंत पिटलेवाड यांनी मानले.

117
12021 views