एस. टी. बस चाकाखाली सापडून वृद्ध जागीच ठार
फलटण, दि. २१ : लोणंद येथील एस. टी. बसस्थानकासमोर एस. टी. बसच्या चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात सोपान महादेव रिटे (वय ७५ रा तरडफ ता. फलटण) या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत लोणंद पोलीसांनी सांगितले की पुणे सातारा रस्त्यावर लोणंद येथे सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सोपान महादेव रिटे हे चालले असताना बसस्थानकातून बाहेर आलेली पारगाव खंडाळा आगाराची एस टी निरा सातारा (क्रमांक एम एच ०७ सी ७०९८) अशी जाताना महादेव रिटे यांचा एस टी बसच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला.