दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य प्रेरणादायी : प्रांताधिकारी सचिन ढोले
फलटण, दि. २० : दुधेबावी ता. फलटण येथील दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे कार्य निश्चित प्रेरणादायी आहे. दुधेबावी प्रतिष्ठानचे समाजोपयोगी कार्य सातारा जिल्ह्यात अग्रेसर असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान दुधेबावी ता. फलटण च्या सन 2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन समारंभ प्रांताधिकारी कार्यालय फलटण येथे झाले.यावेळी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता उद्योजक जगदीशशेठ करवा, उद्योजक तुकाराम कोकाटे, स्वामी हॉस्पीटलचे डॉ.रविंद्र बिचुकले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते.
ग्रामीण भागात सातत्याने गेली 25 वर्षे संत गाडगेबाबा यांच्या नावाने व्याख्यानमाला घेणे ही बाब निश्चित कौतुकास्पद असून आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, गुणवंतांचा सन्मान, स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असे विविध उपक्रम दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र बोराटे, भाजप तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, जुनी पेन्शन संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष रितेश गायकवाड, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा करुणा मोहिते फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनंजय सोनवलकर, प्रसिद्ध वक्ते नवनाथ कोलवडकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मारकड फलटण बार असोसिएशनचे सहसचिव ॲड. अक्षय सोनवलकर फलटण तालुका शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष सागर लोंढे, प्रतिष्ठानचे खजिनदार डॉक्टर युवराज एकळ, सचिव विठ्ठल सोनवलकर, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान चे संचालक भानूदास सोनवलकर डॉ. सागर कराडे दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक डॉ. सागर कराडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे यांनी केले. दुधेबावी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष भांड यांनी शेवटी आभार मानले.