logo

उमराळे खुर्द येथे मोफत हाडांची तपासणी शिबीर संपन्न

दिंडोरी -परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, चाईल्ड सव्हाईवल इंडिया, सनशाइन क्लिनिक नाशिक, ग्रामपंचायत उमराळे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने
भव्य मोफत हाडांची तपासणी शिबिर वार शनिवार दिनांक 18/01/2025 या दिवशी वेळ 10.00ते 2.00 वाजेपर्यंत घेण्यात आले व या शिबिरामध्ये 62 नागरिकांनी तपासणी करून घेतली या प्रसंगी त्यामध्ये ग्रामपंचायत उमराळे खुर्द येथील सरपंच सुरज चारोस्कर अंगणवाडी सेविका शैलाताई गोडसे, वैशाली चारोस्कर आशा सेविका कल्पना शार्दुल आणि चाइल्ड सर्व्हायव्हल इंडिया दिंडोरी चे प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र अहिरे, मेडिकल ऑफिसर डॉ.अनुजा जाधव,फार्मासिस्ट राकेश ढाकणे,आरोग्य शिक्षक कृष्णा पवार व नंदिनी चौधरी,डाटा ऑपरेटर मेघा गायकवाड,आणि अजय तासकर तसेच सनशाइन क्लिनिक नाशिक चे सुप्रसिद्ध डॉ.गणेश आहेर ,संकल्प जाधव व आदी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

2
32 views