नागपुरातील वासनांध समुपदेशक विजय घायवट याच्या पत्नीचा कसून शोध.
गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेली नागपुरातील मोठी बातमी समुपदेशकावर ४ था गुन्हा स्थापित झाला असून त्याला चॊकशीची सूत्रे वेगाने फिरत आहे.
करिअर कौन्सलिंग च्या नावाखाली हुडकेश्वर पोलीस स्टेशन च्या हद्दीतील मनोविकास केंद्र चालविणारा विजय घायवट ला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर १६ जानेवारीला त्याच्यावर ४ था गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या या क्रूर कार्यात त्याच्या पत्नीला सहआरोपी करण्यात आले असून तिचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आलेले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्याच्या पत्नीचा शोध सुरु असून लवकरच त्याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. वासनांध विजय घायवट याने लैंगिक शोषण केलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थिनी या अल्पवयीन होत्या. पत्नीचा शोध लागल्यास अनेक बाबींचा उलगडा होऊ शकतो. पोलिसांनी काही पीडित कुटुंबीयांशी संपर्क साधला असता बदनामी होईल या भीतीने कुटुंबीयांनी तक्रार देण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी आवाहन केले आहे कि विजय घायवट या वासनांध इसमाच्या कृत्याला बळी पडलेल्या शोषितांनी त्याच्या विरोधात तक्रार करावी जेणेकरून अशा पाशवी वृत्तीच्या इसमाला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी.