
विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या गैरसोयीबाबत लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडीचे निवेदन
विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या गैरसोयीबाबत लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडीचे निवेदन
नागपूर, राजनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तिगृहातील विद्यार्थ्यांना जेवणाच्या व्यवस्थेबाबत मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज समाजकल्याण कार्यालय, नागपूर येथे सहाय्यक आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.
हे निवेदन लहुजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष मा. ॲड. हेमंतदादा खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडीचे नागपूर जिल्हाध्यक्ष मा. शुभमभाऊ हिवरारे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांच्या समस्यांचे सविस्तर वर्णन करत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
यावेळी लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव श्री. गरीबाजी खोडके, श्री.अंकुशजी बावने, श्री. बंटीजी इंगळे श्री. पाडन, व श्री. साळवे साहेब उपस्थित होते.
लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडीने प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या हितासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सदरील समस्यांवर पुढील पंधरा दिवसात तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
- लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडी, नागपूर जिल्हा