logo

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सज्ज होतोय महाराष्ट्र!


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत 'कुंभमेळा' आढावा बैठक आज सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे पार पडली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष 2027 मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात आढावा घेतला. यासोबतच पायाभूत सुविधा तसेच इतर अनुषंगिक विकास कामांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला पुढील निर्देश दिले.

✅नाशिकजवळ महाकुंभ उभारून देशातील धार्मिक परंपरा, मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन घडवण्यासाठी भव्य कन्व्हेंशन सेंटर उभारणे
✅नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचे प्रभावी ब्रँडिंग करणे
✅भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था व गर्दी नियोजन सुटसुटीत ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात
✅साधुग्रामसाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन करावे
✅या ठिकाणी नगररचना परियोजन करून हस्तांतरणीय विकास हक्क स्थापित करून ते नगरपालिकेकडे हस्तांतरीत करावे
✅ज्या ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत, ती तात्काळ हटवण्याचे आदेश
✅देशविदेशातून येणाऱ्या पर्यटक व भाविकांसाठी नाशिक येथे 8-10 हेलिपॅड्स तयार करावेत
✅समृद्धी महामार्गाद्वारे नाशिकला जोडणाऱ्या मार्गांचे काम गतीने पूर्ण करावे आणि इगतपुरी ते नाशिक हा मार्ग अधिक प्रशस्त करावा
✅जे मार्ग 2027 पर्यंत बांधणे शक्य आहे, असेच बांधकाम हाती घेण्यात यावे
✅गोदावरी नदीसह सर्व उपनद्यांचे शुद्धीकरण करणे

बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

8
149 views