बिड ;
गेवराई तालुक्यातील शेतकरी पुत्राचा शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने संघर्ष सुरु
प्रति... 16/01/2025
मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक साहेब भूमी अभिलेख मुख्यालय महाराष्ट्र राज्य पुणे
विषय.....
शेतात जाणे येण्यासाठी जमिनीच्या सर्वे नंबरच्या बांधावरून कायमस्वरूपी हक्काचा रस्ता मिळणे बाबत शासन खर्चाने माझी गट नंबर १३४१ मधील एक हेक्टर 62 आर जमीन सातबारा प्रमाणे मोजून देणेबाबत
अर्जदार... राजेंद्र बाबुराव नवले रा.बंगाली पिंपळा ता.गेवराई जि. बीड
महोदय .....
वरील विषयी आपणास सविस्तर माहितीस्तव सादर .
मी अल्पभूधारक गरीब शेतकरी पुत्र आहे गट नंबर 1341 मध्ये माझ्या मालकीची एक हेक्टर 62 आर जमीन आहे शेतात बैलगाडी .ट्रॅक्टर. शेती अवजारे .बी बियाणे. आणि रासायनिक खते नेण्या आणण्यास अडचण निर्माण होत आहे तसेच शेतीमाल कापूस .सोयाबीन .तूर .मूग .गहू .ज्वारी .हरभरा .घरी आणण्यासाठी अडचण निर्माण होत आहे गाडी बैल शेतात ने आण करता येईल असा कायमस्वरूपी रस्ता मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये शेती रस्ता देणे बाबत दिंनाक 16/12/2021 रोजी लेखी अर्ज गेवराई महसूल विभागास सादर केला होता
शासनाने शासन खर्चाने माझी सातबारा प्रमाणे जमीन मोजून देणे माझ्या जमिनीवर श्रीमंत बलवान शेतकऱ्यांनी बांध फोडून अतिक्रमण केले आहे माझी जमीन कमी भरत आहे बांध फोडल्या मुळे जमीन खरडणे. खचने .व पाणी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे शेतजमीन पिकवणे यासाठी त्रास होत आहे माझे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे मानसिक छळ .होत आहे माझ्यावर अन्याय होत आहे शेतीचा बांध रस्ता शेती वहिवाट सातबारा प्रमाणे मोजून देणे माननीय साहेबांना नम्र विनंती ...
## प्रमुख मागण्या #
1) पायवाट किंवा वहिवाट असलेल्या रस्त्याची नकाशे माहिती मा तलाठी साहेब यांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या मा.अधिक्षक साहेबाकडून मिळवावी
2) मा तहसीलदार साहेब. मा.गटविकास अधिकारी साहेब मा.उप अधिक्षक भूमी अभिलेख साहेब मा.तलाठी साहेब .सरपंच साहेब. पोलीस पाटील साहेब. उपसरपंच साहेब
यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बंद असलेल्या रस्त्याची पाहणी करावी
3) ग्रामसभेत ठराव करून शेत रस्ता मंजूर करण्यात यावा व मातोश्री योजने अंतर्गत मला पायवाटांची रुंदी सव्वा आठ फूट गाडी मार्ग साडेसोळा ते एकवीस फुटापर्यंत शेती वहिवाट मुरुमीकरण व खडीकरण करून शेतात जाण्यासाठी रस्ता करून देण्यात यावा
मा.साहेबांना नम्र विनंती आहे 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत शेत रस्ता व शासन खर्चाने शेत जमीन मोजून देण्यात यावी माझी सहनशीलता संपली आहे मी गरीब आहे मी रोज मजुरी केली तर माझा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे मला न्याय देण्यात यावा आपणांस नम्र विनंती आहे
प्रत माहितीस्तव सादर
मा.ना .देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई
मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई
मा.ना.अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई
मा.ना . चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.ना. माणिकराव कोकाटे साहेब कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.ना.जयकुमार गोरे साहेब ग्रामविकासमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.मुख्य सचिव साहेब
महाराष्ट्र राज्य
मा.विभागीय आयुक्त साहेब
आयुक्तालय छत्रपती संभाजी नगर
मा. जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय बीड
मा.जिल्हा अधीक्षक साहेब भूमी अभिलेख कार्यालय बीड
मा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय गेवराई
मा.गेवराई अधिक्षक साहेब भूमी अभिलेख कार्यालय गेवराई
मा गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती कार्यालय गेवराई
मा.तलाठी साहेब कार्यालय बंगाली पिंपळा
मा.ग्रामसेवक साहेब ग्रामपंचायत कार्यालय बंगाली पिंपळा
आपलाच विश्वासू
अन्यायग्रस्त शेतकरीपुत्र
राजेंद्र बाबुराव नवले मु.पो.बंगाली पिंपळा ता.गेवराई जि.बीड
8275003755