logo

देवसाने येथे मोफत नेत्र (डोळे) तपासणी शिबिर*

दिंडोरी -परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, चाईल्ड सव्हाईवल इंडिया दिंडोरी, तुलसी आय हॉस्पिटल नाशिक,आणि ग्रामपंचायत देवसाने यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर वार गुरूवार दिनांक 16/1/2025 या दिवशी वेळ सकाळी 9.30 ते 2.00 वाजेपर्यंत घेण्यात आले व या शिबिरामध्ये 80 नागरिकांनी तपासणी करून घेतली या प्रसंगी त्यामध्ये ग्रामपंचायत चे सरपंच प्रकाश गायकवाड अंगणवाडी सेविका पूजा थोरात तसेच चाइल्ड सर्व्हायव्हल इंडिया दिंडोरी चे प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र अहिरे, मेडिकल ऑफिसर डॉ. सिद्धार्थ गांगुर्डे ,फार्मासिस्ट ऋषिकेश गावडे,आरोग्य शिक्षक तुषार साबळे व महिमा सोनवणे,डाटा ऑपरेटर निशा पवार मेघा गायकवाड आणि देविदास निकम तसेच तुलसी आय हॉस्पिटल नाशिकचे(ऑप्टोमेट्रिस्ट)गोविंद माने, व आदी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

25
2986 views