
आरंभ गोल्ड फायनान्स व पतसंस्थेला उल्लेखनीय कामगिरी केल्याने सन 2025 चा बेस्ट सर्व्हिस प्रोव्हायडर पुरस्कार
फलटण : गेल्या 3 वर्षाच्या कालावधीत फलटण शहर व तालुक्यातील ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या आरंभ गोल्ड फायनान्स राजाळे व आरंभ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित फलटण या फायनान्स व सहकार क्षेत्रातील दोन्ही संस्थांनी उल्लेखनीय केलेल्या कामगिरीमुळे बेस्ट सर्व्हिस प्रोव्हायडर पुरस्कार बॉलीवुड अभिनेत्री ईशा देओल यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले.
देवीदास ग्रुप ऑफ कंपनीज यांच्यावतीने अंधेरी मुंबई येथील रहेजा क्लासिक येथे सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन 2025 बेस्ट सर्व्हिस प्रोव्हायडर पुरस्कार समारंभाचे आयोजन रविवार दि. 12 जानेवारीला करण्यात आले होते. यावेळी देविदास ग्रुप ऑफ कंपनी चेअरमन देविदास नाईकरे, आरंभ गोल्ड फायनान्स चेअरमन सौ. पुनम नलवडे व सीईओ योगेश नलवडे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
देशात महाराष्ट्र राज्यातील उद्योग, बँकींग फायनान्स, सहकार, सामाजिक, शैक्षणिक व अन्य विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संस्थांना देवीदास ग्रुप ऑफ कंपनीज यांच्यावतीने दरवर्षी पुरस्कार देवून गौरविण्यात येते.
राजाळे येथील आरंभ गोल्ड फायनान्स व फलटण येथील आरंभ नागरी सहकारी पतसंस्था या दोन्ही संस्था सभासद, ग्राहक व लोकहितासाठी आर्थिक, फायनान्स व सहकार क्षेत्रात काम करीत आहेत. दोन्ही संस्थांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय व सामाजिक बांधिलकी जपणारे असून ग्राहकांना उत्तम व विनम्र सेवा दिल्याने सन 2025 चा बेस्ट सर्व्हिस प्रोव्हायडर पुरस्कार जाहीर झाल्याचे आरंभ गोल्ड फायनान्सचे सीईओ योगेश नलवडे यांनी सांगितले.
आरंभ गोल्ड फायनान्स व आरंभ पतसंस्थेला बेस्ट सर्व्हिस प्रोव्हायडर पुरस्कार मिळाल्याबद्दल राजाळे, पवारवाडी, वाखरी व फलटण शहर व तालुक्यातील पदाधिकारी, हितचिंतक यांनी दोन्ही संस्थांचे संचालक मंडळाला शुभेच्छा देवून अभिनंदन केले.