
बाळकृष्ण पाडळकर यांच्या वकीलाचं कारटं या पुस्तकास गिरणा गौरव प्रतिष्ठानचा निळूभाऊ फुले वाड्:मय पुरस्कार प्रदान!
नाशिक येथील लेखक श्री . बाळकृष्ण पाडळकर यांच्या दिशोत्तमा प्रकाशन, नाशिक यांनी प्रकाशित केलेल्या वकीलाचं कारटं या पुस्तकास नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानचा वैचारिक साहित्य प्रकारात निळूभाऊ फुले वाड्:मय पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला होता.
सदरचा पुरस्कार वितरण तिसरे शेकोटी लोककला साहित्य संमेलन नाशिक येथे समारंभपूर्वक माजी शिक्षक आमदार तथा जेष्ठ कवी नानासाहेब बोरस्ते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार जेष्ठ कवी लक्ष्मणराव महाडिक, जेष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, आकाशवाणीचे माजी केंद्र संचालक जेष्ठ साहित्यिक उत्तमराव कोरगावकर,मा. श्रीकांत बेनी,मा.दिपक चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला .पुरस्कार मिळाल्याबद्दल लेखक बाळकृष्ण पाडळकर यांचे दत्तु बोडके,बबलु मिर्झा,किरण सोनार, रवींद्र पाटील, समाधान अहिरे,अनिल पाटील,विवेक पाटील,संकेत शिंदे,जयंत मुळे,विवेक भोर,पवन जोशी , मुकुंद रनाळकर,आकाश शिंदे,धिरज पाटील,जी.बी.पवार यांनी अभिनंदन केले आहे.