logo

ग्रा. पं. कार्यालय गोळवण-कुमामे-डिकवल, मालवण येथे *ग्रामसंवाद उपक्रम* आयोजन

मा. पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग यांचा सोमवार दि. 13/01/2025 रोजी सकाळी 10.30 वाजता ग्रा. पं. कार्यालय गोळवण-कुमामे-डिकवल, मालवण येथे *ग्रामसंवाद उपक्रम* आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पोलिस खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून प्रतिबंधक उपाययोजना, सायबर गुन्हे, अंमली पदार्थ, डायल 112 हेल्पलाईन विषयक जनजागृती, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व बालके यांची सुरक्षा तसेच नागरिकांच्या तक्रारीचे त्वरित निरसन व मार्गदर्शन केले. यावेळी गोळवण-कुमामे-डिकवल गावातील ग्रास्थांनी बहुसंख्येने उपस्थित दर्शवली.

श्री. सुभाष द.लाड यांनी माहिती दिली की गोळवण-कुमामे-डिकवल सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक मा. सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या ग्रामसंवाद उपक्रमाअंतर्गत आज गोळवण येथे संपन्न झालेल्या ग्रामसंवाद कार्यक्रमात शाळा गोळवण नं 1 च्या विद्यार्थ्यांनी सायबर गुन्हा व महिला सुरक्षा यावर पथनाट्य सादर केले. त्याला उपस्थिता कडून भरभरून प्रतिसाद मिळाला. सर्व ग्रामस्थ, पोलीस अधिकारी यांनी 5000/- चे बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. महिला सुरक्षा या विषयावर विद्यार्थ्यांनी सादर केलेला प्रसंग, मुलांचा अभिनय पाहून Dysp मा. दाभाडे साहेब गहिवरले. त्यांना अश्रू अनावर झाले.
यावेळी मालवण पोलीस निरीक्षक मा. कोल्हे साहेब, सरपंच मा. सुभाष लाड, उपसरपंच मा. शरद मांजरेकर, ग्रामस्थ पालक मोठया संख्येने उपस्थितीत होते.

17
4611 views