logo

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे पगार लांबणीवर, तीन महिन्यापासून पगार झालेले नाही

महाराष्ट्रात *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* ह्या योजनेमुळे जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेतील शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या तीन महिन्यापासून रोखले

दि 12 जानेवारी 2025
येवला तालुक्यात गेस्ट हाऊस येथे वर्तमान कामगार संघटनेचे मेळावा हा आयोजित करण्यात आला, यामध्ये शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांनी वर्तमान कामगार संघटनेकडे अतिशय खंत मांडलेले आहे पंतप्रधान शक्तिशाली पोषण आहारामध्ये काम करणारे शालेय पोषण आहाराचे कर्मचारी यांचे पगार गेल्या तीन महिन्यापासून प्रलंबित पडलेले असताना राज्य शासन यांच्या पगाराकडे दुर्लक्ष केले आहेत, अशा गोष्टी कामगारांनी मेळाव्यामध्ये बोलून दाखवल्या वर्तमान कामगार संघटनेने शालेय शिक्षण विभाग यांच्याशी वारंवार पत्र व्यवहार करून ही अद्यापी अजून शासनाने कर्मचाऱ्यांच्या पगाराची नियोजन केलेले नाही.
त्याविरुद्ध येवल्या मधून वर्तमान कामगार संघटनेच्या वतीने घोषणा करण्यात आलेली आहे की जर येणाऱ्या काळात शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांचा पगार झाले नाहीत तर या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री *दादा भुसे* यांच्या निवासस्थानी भव्य मोर्चाचे नेणार, तसेच वर्तमान कामगार संघटनेच्या वतीने राज्याचे मंत्री महोदय यांना मालेगाव येथे जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये संघटनेच्या निवेदना वरती योग्य निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांचा पगार करण्यात यावा,
पण अजून पर्यंत मंत्री दादा भुसे यांनी पत्राचे कुठले उत्तर अध्यक्ष यांना दिलेले नाही, याविरुद्ध महाराष्ट्रातून वर्तमान कामगार संघटनेच्या कामगारांच्या वतीने राज्याला नवीन शालेय शिक्षण मंत्री लाभले असतानाही शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांची वारंवार दिशाभूल केल्या जात आहे ज्या ज्या कामगारांना 84 रुपये रोज हे राज्य शासन आणि केंद्र शासन देतं तो सुद्धा वेळेवरती दिल्या जात नाही याविरुद्ध आवाज उठवण्याचा काम हे वर्तमान कामगार संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे संघटनेचे अध्यक्ष शरद लोहकरे यांनी येवल्या मधून इशारा दिलेला आहे की जर एवढ्या आठ ते पंधरा दिवसात शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांचे पगार केले नाही तर येणाऱ्या काळात मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी भव्य शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा हा पाच ते सहा हजार महिला मालेगाव मध्ये उतरू आणि याचा जाब मागू, जर मंत्री दादा भुसे यांनी जर योग्य निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या काळामध्ये वर्तमान कामगार संघटनेच्या वतीने मुंबईमध्ये पायी मोर्चा काढण्याचे नियोजन संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे असे संघटनेचे अध्यक्ष शरद लोहकरे पाटील यांनी सांगितले येवल्यामध्ये वर्तमान कामगार संघटनेच्या मेळाव्यामध्ये शालेय पोषण आहाराचे कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते,शारदा लोहकरे हरिश्चंद्र राऊत, संदीप वाघ, ज्योती थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

15
1700 views