logo

श्री देवी भगवती आईचा वार्षिक जत्रोत्सव २०२५. मुणगे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग।

श्री देवी भगवती आईचा वार्षिक जत्रोत्सव २०२५. मुणगे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग। @highlight

तळकोकणातील एक जागृत देवस्थान श्री देवी भगवती मंदिर,मुणगे ,ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग। श्री देवी भगवती देवीचा वार्षिक जत्रोत्सव हा पौष पौर्णिमा ते संकष्टी दरम्यान पाच दिवस साजरा केला जातो। या पाच दिवसात देवी भक्त देवीची ओटी भरण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी श्री देवी भगवती आईच्या मंदिरात गर्दी करतात।

नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणारी म्हणून श्री देवी भगवती आई संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। त्यामुळेच यात्रोत्सवात भाविक देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी करतात। जत्रेच्या शेवटच्या रात्री लळीताच्या कार्यक्रमाने पहाटे या जत्रोत्सवाची सांगता होते।

1
1609 views