logo

पीएम श्री वरवाडा शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर

तलासरी :- वरवाडा (ता. तलासरी, जि. पालघर): पीएम श्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा, वरवाडा येथे शनिवार, 11 जानेवारी 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन, बालिका आनंद मेळावा व पालकांशी संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला,या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, डहाणू व सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी (IAS) तसेच डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश इभाड सर होते,कार्यक्रमास पंचायत समिती सभापती सुनिता शिंगडा, जि.प. सदस्य अनिल झिरवा, तलासरी नगराध्यक्ष सुरेश भोये, पंचायत समिती सदस्य शरद उंबरसाडा, संतोष खटाले, व राजेश खरपडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशवंती जनाथे, तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूचे प्रतिनिधी जगदीश पाटील व अरुण शेटे, पारसी डेअरीचे यादव साहेब व त्यांचे सहकारी उपस्थित होते,कार्यक्रमात विद्यार्थिनींनी बालिका आनंद मेळावा साजरा करून विविध स्टॉल मांडले. पालक वर्गाच्या उत्साही सहभागाने कार्यक्रमाला अधिक रंगत आली. सुत्रसंचालन डॉ. विद्या शिंदे व अंगद कदम यांनी उत्तम रित्या पार पाडले,शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे पालक व उपस्थितांचे भरभरून कौतुक झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेचे सर्व शिक्षक व व्यवस्थापन यांचे अभिनंदन करण्यात आले.

49
2159 views