logo

लातूर -टाकळीच्या धनगर तरुणाला एवढं मारलं की शेवटी जीव गमावलाच, धनगर समाजानं दिला आंदोलनाचा इशारा, लक्ष्मण हाकेही येणार..

लातूर- टाकळी येथे धनगर समाजाच्या 18 वर्षीय तरुणाला गावातीलच सात आठ लोकांनी जबर मारहाण केली होती.
यानंतर दोन महिने उपचार करूनही प्रकृती न सुधारल्याने 6 जानेवारीला त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेविरोधात या कुटुंबाने आणि धनगर समाजाने योग्य ती कारवाई करावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या कुटुंबाला भेटण्यासाठी लक्ष्मण हाके लातूरमध्ये येणार असल्याची माहिती आहे.
माऊली उमाकांत सोट या 18 वर्षीय तरुणाला गावातीलच कमलाकर डुरे गोपाळ डुरे गोविंद खेडकर मनोज उपाडे कुमार उपाडे बालाजी खेडकर रंगनाथ डूरे यासह इतर आरोपींनी घरी बोलून जबर मारहाण 27/ 10 /2024 रोजी केली होती. घटनास्थळी पोलीस तब्बल दोन ते तीन तासानंतर आले. दोन दिवस माऊली शुद्धीवर होता या काळात पोलिसांनी त्याचा जबाब घेतला नाही. त्यानंतर माऊली कोमात गेला . दोन महिने सातत्याने उपचार केल्यानंतर सुद्धा त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. सहा जानेवारी रोजी माऊलीचा मृत्यू झाला.पोलिसांनी त्याच वेळेस जबाब घेतला असता तर, आरोपींच्या विरोधात ठोस पुरावा मिळाला असता, असे काही जणांचे म्हणणे आहे,मात्र पोलिसांनी यात तत्परता दाखवली नाही, असा आरोप आता माऊलीच्या नातेवाईकांनी आणि धनगर समाजाने केला आहे. या प्रकरणात आता लक्ष्मण हाके हे नातेवाईकांची भेट घेणार आहेत.

45
6757 views