logo

लातूर : बस - मोटरसायकल अपघातात युवक जागीच ठार

अहमदपूर : बस - मोटारसायकल अपघातात एक ३५ वर्षीय युवक शेतकरी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना ९ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ढाळेगाव - खंडाळी रस्त्यावर घडली आहे.
बाबत मिळालेली माहीती अशी की, ढाळेगाव ता.अहमदपूर येथील अल्पभूधारक युवक शेतकरी महावीर विश्वनाथ गुंठे वय - ३५ वर्षे हे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेताकडून घराकडे निघाले असता गावापासून अर्ध्या किलोमीटरवर समोरून येणाऱ्या चाकूर- अहमदपूर बस क्रमांक एम.एच.२० बी.एल.१७७८ या बसची त्यांना धडक बसली.यात महावीर गुंठे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते जागीच ठार झाले.रस्त्याच्या दोन्ही बाजूस केबल टाकण्यासाठी खोदकाम केले असून थातूर मातूर बुजवाबुजवी केली आहे.
त्यामुळे छोट्या वाहनास गाडी चालविणे जिकरीचे झाले असून यामुळेच हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.

हा अपघात इतका भीषण होती की एस.टी.च्या ड्रायव्हर कडील बाजूचा पत्रा तुटला असून मोटरसायकलचा चेंदामेंदा झाला आहे.या अपघाताची माहिती मिळताच किनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुनील श्रीरामे व सोनवणे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून महावीर गुंटे यांचे प्रेत शववच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी येथे पाठविले.अहमदपूर आगाराचे आगार प्रमुख देशमुख यांनी घटनास्थळास भेट देऊन अपघातग्रस्त बस किनगाव पोलीस स्टेशनला पाठवून दिली. या घटनेचा गुन्हा नोंदवण्याचे काम किनगाव पोलीस सुरू आहे.महावीर गुंटे हे अल्पभूधारक युवा शेतकरी असून प्राणीमित्र व सर्पमित्र म्हणून सर्वत्र परिचित होते.त्यांच्या अपघाती व दुदैवी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

52
4649 views