logo

वसतिगृहाच्या विद्यार्थांच्या वाचनालयासाठी इमारत मिळण्यासाठी आवाहन*

अमरावती , दि .९ : आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या विद्यार्थांसाठी दोनशे आसन क्षमतेच्या वाचनालयासाठी अमरावती शहरात इमारत भाडेतत्त्वावर मिळण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी केले आहे.
प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या वाचनालयासाठी दोनशे आसन क्षमतेची इमारत भाडेतत्त्वावर हवी आहे. यासाठी संबंधितांनी प्रस्ताव प्रकल्प कार्यालय, धारणी येथे सादर करावे. या वाचनालयासाठी भाडेतत्त्वावरील इमारतीचे प्रस्ताव सादर करत असताना इमारत भौतिक सोयी-सुविधा व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण इमारत असणे अनिवार्य आहे. प्रकल्प कार्यालय, धारणीचे ई-मेल - poitdp.dharni-mh@gov.in/podharni@gmail.com यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

2
58 views