logo

राज्य वाङ्‌मय पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि.९ : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना राबविण्यात येते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार या योजनेंतर्गत निवडी अंती सन २०२४ चे राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी दि. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेल्या प्रथम आवृत्ती पुस्तकांसाठी दि.१ जानेवारी, २०२५ ते ३१ जानेवारी, २०२५ या विहित कालावधीत प्रवेशिका मागविण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर प्रवेशिकेच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे उपलब्ध आहेत. दिनांक १ जानेवारी, २०२५ ते ३१ जानेवारी, २०२५ या विहित कालावधीत या कार्यालयास प्राप्त झालेल्या प्रवेशिका व पुस्तके खास दूतामार्फत किंवा टपालाने दि. १० फेब्रुवारी, २०२५ पर्यंत सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत , दुसरा मजला ,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५ या कार्यालयात पाठविण्याबाबत कळविण्यात आले आहे. आपल्याकडील प्रवेशिका दि . १० फेब्रुवारी, २०२५ पर्यंत या कार्यालयाकडे पाठविण्यास संबंधितांना सूचना द्याव्यात. त्यानंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारण्यात येणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले.

1
42 views