logo

वसतिगृहाच्या विद्यार्थांच्या वाचनालयासाठी इमारत मिळण्यासाठी आवाहन

अमरावती , दि . ९: धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत न्युक्लिअस बजेट योजनेतंर्गत आदिवासी बांधवांसाठी वर्षभर विविध योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गंत मंजूर योजनांचा लाभ घेण्यासाठी अनूसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून विविध योजनांचे अर्ज निःशुल्क मागविण्यात येत आहेत. प्रसिध्दी दिनांकापासून अर्ज स्वीकारण्याची अंतीम तारीख दिनांक 14 फेब्रुवारी 2025 राहील. याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, सहायक जिल्हाधिकारी तथा धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी केले आहे.
प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी कार्यक्षेत्राअंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2024-2025 अंतर्गत मंजूर योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून योजनांचे अर्ज निःशुल्क मागविण्यात येत आहेत. या योजनांचे अर्ज धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर, तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय, धारणी या ठिकाणी अर्ज उपलब्ध आहेत. तसेच नांदगाव खंडेश्वर, भातुकली, अमरावती, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती येथे अर्ज उपलब्ध आहेत. तसेच मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूर बाजार तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत उप कार्यालय, मोर्शी येथे अर्ज उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी विकास शाखा, दूरध्वनी क्र. 07226-224217 येथे संपर्क साधावा.

*_पुढील योजनांसाठी अर्ज पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत :_*
आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना तुषार सिंचन संच 85% अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना शेतीच्या संरक्षणासाठी तार जाळी, सोलर फेंसिंग 85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी महिला बचतगटांना 85 टक्के अनुदानावर कृषी अवजारे बँक उघडण्यासाठी अर्थसहाय्य देणे, आदिवासी महिलांना 85 टक्के अनुदानावर सोयाबीन, गहू, मका इत्यादी पीक कापणीसाठी कापणी यंत्रण (ब्रश कटर) पुरवठा करणे, आदिवासी लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाचा 85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी महिला पुरुष बचत गटांना अगरबत्ती मेकींग मशिन 85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी महिला बचत गटांना पापड मेकींग मशीन 85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी सुशिक्षित युवक-युवतींना 85 टक्के अनुदानावर होजियरी मशीन खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, आदिवासी बचत गट, समुह यांना 85 टक्के अनुदानावर मंडप डेकोरेशन, डी.जे. साऊंड इत्यादी साहित्य खरेदी करण्यासाठी अर्थ सहाय्य देणे, आदिवासी युवतींना 85 टक्के अनुदानावर शिलाई मशीन खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे तसेच आदिवासी बचत गट, समुहाला लाकडापासून कलात्मक शोभेच्या वस्तू तयार करुन विक्री करण्यासाठी 85 टक्के अनुदानावर अर्थ सहाय्य करणे या योजनांचा समावेश आहे.

वरील योजनांसाठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या जेष्ठतेनुसार संगणीकृत यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करुन पात्र तसेच अपात्र अर्जदारांच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येईल. लाभार्थी निवड करताना दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, अपंग, विधवा, परित्यक्ता, निराधार महिला यांना प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यात येईल.

*** अमरावती , दि.९: आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या विद्यार्थांसाठी दोनशे आसन क्षमतेच्या वाचनालयासाठी अमरावती शहरात इमारत भाडेतत्त्वावर मिळण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी केले आहे.
प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या वाचनालयासाठी दोनशे आसन क्षमतेची इमारत भाडेतत्त्वावर हवी आहे. यासाठी संबंधितांनी प्रस्ताव प्रकल्प कार्यालय, धारणी येथे सादर करावे. या वाचनालयासाठी भाडेतत्त्वावरील इमारतीचे प्रस्ताव सादर करत असताना इमारत भौतिक सोयी-सुविधा व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण इमारत असणे अनिवार्य आहे. प्रकल्प कार्यालय, धारणीचे ई-मेल - poitdp.dharni-mh@gov.in/podharni@gmail.com यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

1
359 views